BJP Releases First List | भाजपची पहिल्या 125 जागांची यादी जाहीर, यादीत 'या' बड्या नेत्यांची नावचं नाही | ABP Majha

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 125 जागांची यादी जाहीर केली आहे. 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नाही. तसंच नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या गणेश नाईक यांना उमेदवारी न देता, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola