मुंबई : मराठा आरक्षणासाठी राजीनामा सत्र की राजीनामा नाट्य?

Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरादांचं राजीनामा सत्र सुरु आहे. मात्र, काही आमदारांनी आपला राजीनामा मराठा समाजातील प्रतिनिधींकडे दिल्यानं हे राजीनामा नाट्य आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला. जाधव यांच्यापाठोपाठ आता देवाळा चांदवड मतदार संघाचे भाजप आमदार राहुल आहेर आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा देऊ केलाय. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही आमदारांनी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा दिला आहे. समाज मोठा आहे. त्यामुळे राजीनामा त्यांच्याकड़े दिल्याचं या आमदारांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram