VIDEO | भाजपला धोक्याची घंटा, सेनेला स्वबळाचा फटका बसण्याचा अंदाज | मूड देशाचा | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असताना एबीपी माझा आणि सी वोटरच्या सर्व्हेत धक्कादायक मूड हाती आला आहे. 2019 च्या निवडणुकीत मोदी लाट ओसल्याचं मूडमधून स्पष्ट दिसत आहे. देशात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फक्त 233 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडी 167 जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाली नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा फायदा होणार हे या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.