मुंबई : मुख्यमंत्र्यांसह परेश रावल यांची उपोषणाला हजेरी, औरंगाबादमध्ये दानवेंचंही उपोषण

Continues below advertisement
काँग्रेसप्रमाणे आज भाजपनंही उपोषणाचं हत्यार उगारलं. सलग 23 दिवस संसदेचं कामकाज ठप्प राहिल्यानं देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांनी उपोषण केलं... दिल्लीत आपलं कामकाज करत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करत आहेत. तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह देशभरातील भाजपचे खासदार, आमदार आणि कार्यकर्ते उपोषणाला बसले...
भाजप अध्यक्ष अमित शाह तिकडे कर्नाटकातील हुबळीमध्ये उपोषण केलं... मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणूक आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या कर्नाटकात तळ ठोकून आहेत. आणि तिथेच ते उपोषणाला बसले...
यापूर्वी दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात काँग्रेसनं एक दिवसाचा उपवास केला होता. त्यानंतर आता भाजपही विरोधकांविरोधात मैदानात उतरली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram