पाटणा : अररियात राजद उमेदवाराच्या विजयानंतर देशविरोधी घोषणाबाजी?
Continues below advertisement
बिहारच्या अररियामध्ये राजदच्या विजयानंतर देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप होतोय. अररिया लोकसभा जागेवर पोटनिवडणूक झाली होती. पण त्यात राजद उमेदवार सरफराज आलम यांच्या विजयानंतर देशविरोधी घोषणा दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झालाय. यामध्ये आलम यांच्या घराजवळ अनेक आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचं या व्हीडिओतून दिसतंय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तर याप्रकरणी खासदार सरफराज आलम यांच्यावर कारवाईची मागणी त्यांच्याविरोधात लढणाऱ्या प्रदीप सिंह यांनी केलीये.
Continues below advertisement