भारत बंद : बिहार, उत्तर प्रदेशात रेलरोको आणि रास्तारोको
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे देशभर अनेक ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि निदर्शनं सुरु आहेत. उत्तर भारतात मात्र भारत बंद आंदोलनाची तीव्रता अधिक आहे. बिहारच्या आरामध्ये आंदोलकांनी रेलरोको केला आहे. तर अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे. बिहारचा काही भाग वगळता उत्तर प्रदेश, पंजाब अशा अनेक ठिकाणी शांततेत भारत बंद पुकारण्यात आला आहे.