Bigg Boss Marathi 2 | बिग बॉसच्या घराबाहेरही आमचं नातं कायम राहणार : शिव-वीणा | ABP Majha

मराठी बिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता टॉप 6 स्पर्धक एकमेकांना भिडतील आणि त्यानंतर ठरेल कोण होणार मराठी बिग बॉस 2 चा विजेता. या सगळ्यामध्ये एक प्रेमकथाही फुलली आहे. ती आहे शिव आणि वीणाची. बिग बॉसच्या घरात आल्यावर या दोघांचं ट्युनिंग झालं आहे ते खरंच आहे की बाहेर गेल्यावर त्यात काही बदल होईल यावर दोघांनी एकमताने 'नाही' असं उत्तर दिलं. म्हणजे, असं की आता जे त्यांचं ट्युनिंग, केमिस्ट्री जमून आली आहे ती कायम राहणार आहे. याबद्दल बोलताना वीणा म्हणाली, "खरंतर आम्ही जे काही वागलो ते काही ठरवून नव्हतं. आमची मैत्री झाली आणि मग आता आमचं खूपच चांगलं ट्युनिंग आहे. त्यामुळे हे नातं आम्ही यापुढे निभावणार आहोत."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola