बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि पुनीश यांच्या रोमान्समुळे तर कधी हिना खानच्या ड्राम्यामुळे हा सीझन गाजतोय. पण आता सगळ्यात जास्त चर्चा 'भाभीजी घर पर है'मध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारलेली शिल्पा शिंदे आणि निर्माता विकास गुप्ता यांची आहे.