तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा | नवी दिल्ली | एबीपी माझा
Continues below advertisement
तिहेरी तलाकचं विधेयक दुपारी 2 वाजता लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसनं आपापल्या खासदारांना व्हीप जारी केलाय. यापूर्वीही केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, राज्यसभेत ते अडकून पडलं होतं. त्यानंतर या संदर्भात सप्टेंबरमध्ये वटहुकूम काढण्यात आला होता. राज्यसभेत या विधेयकला विरोध झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यात सुधारणा केल्या आहेत. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी केंद्र सरकारला प्रयत्न करावे लागतील. नाही तर पुन्हा वटहुकूम काढण्याची वेळ सरकारवर ओढवू शकेल.
Continues below advertisement