मुंबई : बिग बॉसमधील हुकुमशाह टास्कवर होस्ट महेश मांजरेकर यांचं ट्वीट
'मराठी बिग बॉस'च्या घरातला सध्याचा आठवडा 'हुकूमशाही' स्वरुपाचा आहे. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेला स्पर्धक नंदकिशोर चौगुलेने चक्क मेघा धाडेला बुटावर नाक घासायला लावलं. महिलांविषयी नंदकिशोरच्या वर्तनामुळे प्रेक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही आपल्याला शरम वाटत असल्याचं ट्वीट केलं आहे. हे ट्वीट बिग बॉस संपल्यानंतर म्हणजे ठीक रात्री 11 वाजता करण्यात आलं आहे. त्यामुळे मांजरेकरांनी नंदकिशोरच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.