
BIG BOSS MARATHI 2 | मला बिचुकलेच्या कानाखाली वाजवायची आहे : रुपालीची आई | ABP Majha
मला अभिजीत बिचुकलेच्या कानाखाली वाजवायची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली भोसलेच्या आईने दिली आहे. अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात हा प्रकार घडला होता. यानंतर एबीपी माझाशी केलेल्या बातचीतमध्ये रुपालीच्या आईने ही प्रतिक्रिया दिली.