कोल्हापूर : जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभिषण पाटील यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबई : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, क्रिकेटर रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 2014-15 साठी अॅथलेटिक्समध्ये रमेश तावडे, 2015-16 साठी मल्लखंब खेळातील अरुण दातार आणि 2016-17 साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात बिभीषन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षके विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिवाय नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार जाहीर झाला. तर 2014-15 साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
नुकतीच 7 महासागरं पोहून पार करत जागतिक विक्रम करणारा जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरवण्यात येणार आहे. पुरस्कारांसाठी 776 अर्ज आले होते. यातून ऑनलाईन पद्धतीने 195 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. 17 फेब्रुवारीला गेट ऑफ इंडियाला राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.