सिंधुदुर्ग : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक, मुंबई-गोवा महामार्ग रोखला
Continues below advertisement
सिंधुदुर्गातही आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. कुडाळ तालुक्यातील बिबवणे गावात मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून चक्का जाम आंदोलन केलं. यावेळी महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्धा तास आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला. रात्री १२ वाजता हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. त्यामुळं तळकोकणातही मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला पहायला मिळतोय.
Continues below advertisement