भोपाळ : माथेफिरुने मॉडेलला डांबलं, सुटकेचे आटोकाट प्रयत्न

Continues below advertisement

मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये गेल्या 11 तासांपासून सुरु आहे... एका मॉडेलचं ओलीसनाट्य...
एका माथेफिरु तरुणानं एका मॉडेल तरुणीला तिच्याच फ्लॅटमध्ये कैद करुन ठेवलं आहे... आज सकाळी 6 वाजता रोहित नावाचा तरुण या मॉडेलच्या फ्लॅटमध्ये आला... आणि तेव्हापासून त्यानं फ्लॅटला आतून कडी लावून तिला ओलीस ठेवलं आहे.
बंधक तरुणी आणि रोहित हे मित्र-मैत्रिण आहेत... दोघेही मॉडेलिंगच्या निमित्तानं काही दिवस मुंबईमध्ये राहात होते... पण दोघांमध्ये मतभेद झाल्यानं ती तरुणी भोपाळला आपल्या घरी परत आली... तिला पुन्हा मुंबईला परत घेऊन जाण्याच्या हट्टाने रोहित घरी आला.. आणि त्याने हे ओलीसनाट्य सुरु केले...
दरम्यान या तरुणीला ओलीस ठेवल्याची बातमी कळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घेराबंदी केली आहे...मात्र तरूणीच्या बचावासाठी गेलेल्या पोलिसांवरही तरूणानं कात्रीनं वार केलेत.
या 11 तासांच्या काळात या तरुणाशी फोनवरुन व्हीडिओ कॉलिंगही करण्यात आलंय... त्यावेळी त्याने आपण या तरुणीला जखमी केल्याचंही सांगितलंय... रोहितकडे पिस्तुल चाकू आणि कात्री अशी हत्यारे आहेत... त्यामुळे त्याच्याशी वाटाघाटी करुन त्या तरुणीची सुटका करण्याचा प्रयत्न सुरु आहे... पण गेल्या 11 तासांपासून हा तरुण ऐकायला तयार नाही...
विशेष म्हणजे या तरुणीला धमकावल्याप्रकरणी जानेवारी महिन्यामध्ये तरुणीच्या कुटुंबियांनी रोहितविरुद्ध तक्रारही दाखल केली होती... त्यानंतर त्याला अटकही कण्यात आली होती..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram