भिवंडी : बुलेट आणि कंटेनरच्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2018 07:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भिवंडीमध्ये कंटेनर आणि बुलटेच्या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी अंत झालाय. शेलार ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या बोरपाडा इथे एका बुलेट स्वाराला विरूद्ध दिशेनं येणाऱ्या कंटेनरनं धडक दिल्यामुळे बुलेटवरच्या 3 युवकांचा जागीच मृत्यू झाला. असद मिर्झा, शोहिद अन्सारी आणि समीर अन्सारी अशी त्या तिघांची नावं आहेत. तिघांचंही वय 20 ते 23 वर्षांच्या दरम्यान होतं. या अपघातानंतर कंटेनरचा चालक फरार झालाय.