भिवंडी : गरोदरपणातही दारु मागितल्याने पतीकडून पत्नीची हत्या
Continues below advertisement
गरोदरपणातही दारु आणि सिगारेट पिण्यासाठी पतीकडे सतत तगादा लावणाऱ्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केली आहे. भिवंडीतील अनगांवमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपी पतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलातच तिचा मृतदेह पुरला. कल्पेश सुदाम ठाकरे असे आरोपीचे नाव आहे. मनिषा ही व्यवसायाने बारबाला होती. त्यामुळे लग्नापूर्वीपासूनच दारु व सिगरेट पिण्याचे तिला व्यसन होते.
विशेष म्हणजे पोलीस आणि कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी कल्पेशने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात नोंदवली होती. अखेर तपासाअंती कल्पेशनंच खून केल्याचं समोर आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.