भिवंडी : क्रिकेट मॅच सुरु असताना मैदानात वावटळाची एन्ट्री, खेळाडूंसह प्रेक्षकांची धावपळ

Continues below advertisement

भिवंडीमध्ये क्रिकेटची मॅच सुरु असताना अचानक एक महाकाय वावटळ आलं आणि त्यामुळे खेळाडूंनाच मैदानातून काढता पाय घ्यावा लागला. जोराचा वारा सुरु झाला आणि तेवढ्यात मैदानात आलेल्या वावटळाने महाकाय रुप धारण केलं. पण उन्हाळ्याच्या दिवसात उठणाऱ्या सामान्य वावटळीसारखं हे नव्हतं तर या वावटळाची उंची तब्बल २०० मीटरपेक्षाशी जास्त होती. विशेष म्हणजे मैदानात हे वावटळ बराच वेळ गोल फिरत होतं त्यानंतर प्रेक्षकांच्या दिशेने गेल्यावर हवेत विरलं. ही सगळी दृष्य कॅमेऱ्यात कैद झालीयेत. पण या वावटळीमुळे संपुर्ण मैदानात धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. शेवटी आयोजकांनी मैदानावर पाणी मारलं,,प्रेक्षकांच्या गॅलरीत साफसफाई केली त्यानंतर पाऊन तासांनी क्रिकेटची मॅच पुन्हा सुरु झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram