भिवंडी : अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याप्रकरणी पालिकेच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा

Continues below advertisement
अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या भिवंडी महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. यामुळे भिवंडी-निजामपूर पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रभाग समितीचे ४ चे सहाय्यक आयुक्त श्रीकांत औसरकर, बीट अधिकारी मकसूद शेख, कनिष्ठ अभियंता एजाज घोरी आणि सहाय्यक अभियंता सरफराज अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश असूनही या अधिकाऱ्यांनी त्याबाबत टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram