Milk Theft | भिवंडीत अमूलच्या दुधाची चोरी करणारा एजंट सीसीटीव्हीत कैद | भिवंडी | ABP Majha

भिवंडी शहरात अमूल दुधाची चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. त्यामुळे वैतागलेल्या दूध विक्रेता एंजटने दूध विक्री केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा लावले. त्यानंतर दूधाची होणारी चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. महत्वाची बाब म्हणजे दुधाची चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्याही एक दूध विक्री एजंटच असल्याचं समोर आलंय. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर निजामपूर
पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलंय. भिवंडी शहर आणि नजिकच्या तालुक्यात अमूल दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी विक्रेत्यांकडून रात्री एक ठिकाणी दूधाचे कॅरेट ठेवले जायचे. मात्र, गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात दुधाची चोरी होत होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram