भिवंडी : धोकादायक इमारतीवर पालिकेची अर्धवट कारवाई, 90 वर्षीय वृद्धाचा जीव धोक्यात
Continues below advertisement
भिवंडी महापालिकेच्या अर्धवट कामामुळे 90 वर्षीय व्यक्तीचा जीव धोक्यात आला आहे. घुंगटनगरमध्ये असलेली मोती ही धोकादायक इमारत दहा महिन्यांपूर्वी पालिकेकडून तोडण्यात आली. मात्र या इमारतीवर अर्धवट कारवाई करण्यात आली होती. या इमारतीमध्ये असलेल्या 40 कुटुंबांना महापालिकेने सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं. त्यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेले अंबादासभाई निवाने या 90 वर्षीय व्यक्तीची रुम सोडून महापालिकाने बाकी संपूर्ण इमारत पाडली.
Continues below advertisement