भिवंडी : पुराच्या विळख्यातून तीन मित्रांना वाचवण्यात यश
Continues below advertisement
भिवंडीत पुराच्या विळख्यात अडकलेले तिघे मित्र थोडक्यात बचावले आहेत. स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने या तिघा तरुणांना वाचवण्यात यश आलं आहे. कोनगावात राहणारे अनिल पटेल, नविन राठोड आणि कुणाल म्हात्रे हे तिघे मासे पकडण्यासाठी गावातील खाडी किनारी असलेल्या ओढ्यात गेले होते. मात्र अचानक पुराच्या पाण्याने या तिघा मित्रांना वेढले. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. स्थानिकांनी ही माहिती कळताच अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. स्थानिक, अग्निशमन दलाचे जवानांनी पोहत ओढ्याच्या पलिकडे गेले आणि तिन्ही मित्रांना सुखरूप बाहेर काढले.
Continues below advertisement