भिवंडी : मदरशातील जेवणातून 26 मुलांना विषबाधा

Continues below advertisement
भिवंडी शहरातील रोशनबागमधील मदरशात एका धार्मिक कार्यक्रमादम्यान 26 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. पाच मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मुंबईतल्या नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दारुल उलूम दिवानशा मदरशामध्ये ही घटना घडली. बारा ते चौदा वयोगटातल्या 30 मुलांना याठिकाणी जेवणासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. जेवणानंतर त्यांना मळमळ आणि उलटी झाल्यानं या मुलांना रुग्णालयात हलवण्यात आलं. जेवणात नासके, बुरशीयुक्त पदार्थ दिल्यानं ही विषबाधा झाल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram