भिवंडी: भंगार गोदामाला लागलेली आग धुमसतीच

Continues below advertisement
भिवंडीतल्या गायत्रीनगर परिसरातील भंगार गोदामाला मध्यरात्री लागलेली भीषण आग अजूनही धुमसतेच आहे.. सरदार कम्पाऊंडमधल्या आगीवर गेल्या अनेक तासापासून नियंत्रण मिळवता आलेलं नाही. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास इथं ही आग लागल्याचं समजतं आहे. या गोदामात भंगार आणि प्लास्टिकचं सामान अधिक असल्याने ही आग अधिकच वाढत असल्याची माहिती मिळतेय... अगदी 2 किलोमीटरवरुनही या आगीचा धूर दिसतोय..  या आगीमध्ये 23 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे. मात्र आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या गोदामांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. सकाळी या परिसरातून 15 ते 20 लोकांना वाचवण्यात आलं...कल्याण आणि उल्हासनगरमधील अग्निशमन दलाच्या गाड्या इथं दाखल झाल्या असून अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram