
भिवंडी : शहरात पावसाचं थैमान, ठिकठिकाणी पाणी साचलं, वाहतूकही खोळंबली
Continues below advertisement
भिवंडीत दुपारी तीन वाजल्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केलीय. यामुळे शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तिनबत्ती, शेलार, गैबीनगर, नद्दीनाका परिसरातील घरे व दुकाने पाण्यात बुडाली आहेत. अनेक ठिकाणी तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्या बंद पडल्या आहेत. खाडीपार या परिसरातील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला आहे.
Continues below advertisement