Gold Theft | बुरखाधारी महिलांची हातसफाई, सोन्याच्या दुकानातून बांगड्या चोरल्या | भिवंडी | ABP Majha
भिवंडीतल्या केसरबाग येथील किरण ज्वेलर्स दुकानात सोनं खरेदी करण्याच्या बहाण्यानं महिलांनी चोरी केलीय. चोरीवेळी तिन्ही महिलांनी बुरखा परिधान केला होता. यावेळी महिलांनी कर्मचाऱ्याचं लक्ष विचलित करुन 38 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. बुरखाधारी महिलांची चोरी दुकानातील सीसीटीव्हीत कैद झालीए. तरी, भोईवाडा पोलिसात 3 अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.