भिवंडी : काल्हेरमध्ये मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग
Continues below advertisement
भिवंडी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं आगीचं सत्र थांबण्याच नाव घेत नाहीय. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे एका मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत इतर चार गोडावून जळून खाक झाले आहेत. घटनास्थळी भिवंडी, ठाणे आणि कल्याण येथील अग्निशमन दलाच्या 5 गोड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement