रायगड : भिरा गावात सर्वोच्च तापमान, पारा 42 अंशांवर
Continues below advertisement
दुपारच्या वेळी तुम्हाला उन्हात बाहेर पडायचं असेल तर काळजी घ्या कारण मुंबईसह कोकण आणि विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. रायगड जिल्ह्यातल्या भिरामध्ये काल तब्बल ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुंबईतही तब्बल ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिकडे मुंबई, पुणे, नाशिकमध्येही उन्हानं लोक हैराण झाले आहेत.
Continues below advertisement