कोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या
Continues below advertisement
कोरेगाव भीमा हिंसाचारात ज्या पूजा सकट नावाच्या मुलीचं घर काही समाजकंटकांनी जाळलं होतं, त्या पूजाने आत्महत्या केली आहे. 1 जानेवारीला कोरेगाव भीमात हिंसाचार झाला होता. त्यात पूजाचं घर जाळण्यात आलं होतं. यांसदर्भात शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, घर जाळण्यात आल्यानंतर पूजाचं कुटुंब कोरेगाव भीमाजवळील वाडा इथं रहायला गेलं. मात्र, काही दिवसानंतर त्या जागा मालकाने पूजाच्या कुटुंबाला घर सोडण्याचा तगादा लावला. त्यानंतर पूजा अचानक घरातून गायब झाली. त्यानंतर रविवारी तीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. दरम्यान, पूजा आणि तिच्या कुटुंबियांना त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Continues below advertisement