पुणे : मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज 20 फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्यात आला आहे. हायकोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात कालच पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला होता. त्यानंतर त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. पुणे सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. पण आता त्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कोरेगाव- भीमा प्रकरणी राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने निर्देश दिले.