पुणे : बिर्याणी खात सुवर्णपदकासाठीच्या 'त्या' अटीचा भीम आर्मीकडून निषेध
पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीविरोधात भीम आर्मीनं वेगळ्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसमोरच बिर्याणी खात विद्यापीठाच्या वादग्रस्त निर्णयाचा निषेध करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.