भाईंदर : मनसेच्या विभागप्रमुखाला फेरीवाल्यांची मारहाण, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement
मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात भाईंदरमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काल रात्री मनसेच्याच कार्यकर्त्यांनी मारहाणीचा आरोप असणाऱ्या दोघांना भाईंदरमधून पकडलं आणि त्यानंतर दोघांनाही मालाड पोलिसांच्या ताब्यात दिलं. मालाडमध्ये अवैध फेरीवाल्यांना हटवताना काही फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी अवैध फेरीवाल्यांची स्टॉलची तोडफोड केली. सध्या सुशांत माळवदे यांच्यावर कांदिवलीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram