भंडारा : आचारसंहितेतही शेतकऱ्यांना मदतीचं वाटप, राष्ट्रवादी आक्रमक

Continues below advertisement
आचारसंहिता सुरु असतानाही तुडतुड्या किडीची लागण झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचं काम सुरु होतं. त्यासाठी काल रात्री चक्क उशिरापर्यंत भंडाऱ्यातील सरकारी ट्रेजरीमध्य़े अधिकारी काम करत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ट्रेजरी डिपार्टमेंटमध्ये शिरुन हे काम बंद पाडलं. 'माझा'ने ही बातमी दाखवल्यानंतर अखेर ही मदत थांबवण्यात आली. आता 29 मे नंतर मदत दिली जाणार आहे.  हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्य़ांना नुकसान भरपाईची मागणी विरोधकांनी केली होती..त्यावेळी सरकारने ही मागणी मान्यही केली. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि ते ही आचारसंहितेच्या काळात सरकारनं देऊ केलेल्या मदतीमुळे भाजप इथंही अडचणीत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram