भंडारा - गोंदिया : नाना पटोलेंशी मतभेद संपले : प्रफुल्ल पटेल
Continues below advertisement
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर "खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु", असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Continues below advertisement