भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : 450 ईव्हीएम बंद : प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असून पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 31 मे रोजी जाहीर होईल. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत.
भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याठिकाणी फेरनिवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याठिकाणी फेरनिवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.