भंडारा: बहुचर्चित प्रीति बारिया हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशी

Continues below advertisement
बहुचर्चित प्रीति बारिया हत्या प्रकरणात भंडारा जिल्हा न्यायालयनं दोघांना फाशी दिलीय. अमीर शेख आणि सचिन राऊत अशी यांची नावं आहेत.
तीन वर्षापुर्वी म्हणजे 30 जुलै 2015 रात्री साडेआठ वाजता भंडारा शहराच्या समृद्धी नगरमध्ये ए सी दुरुस्त करण्याच्या बाहण्यानं या दोघांनी रूपेश बारिया यांच्या घरी प्रवेश केला.आणि 30 वर्षीय प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोड़ीनं वार करून हत्या केली. एवढंच नाही तर त्यांच्या 9 वर्षाचा मुलगा भव्य बारिया याच्या डोक्यावर हातोडीनं वार केले.यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर भव्य बारीया याला अर्धांगवायूने ग्रासलंय. तो आता बोलूही शकत नाही.
आरोपी दोघांनी याच दिवशी सकाळी भंडारा शहरातील रवींद्र शिंदे यांच्या घरी त्यांच्या मुलीलाही मारहाण केली होती. त्यानतंर पोलिसांनी या दोघांना अटक केली आणि आज कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram