बेंजामिन आणि सारा नेत्यानाहू ‘ताज’च्या प्रेमात!
सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणाऱ्या इस्रायलचे पतंप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आग्र्यातील जगप्रसिद्ध ‘ताजमहल’चे दर्शन घेतले. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांनी सुमारे एक तास ताजमहल परिसरात वेळ घालवला. तिथे फिरले आणि फोटोही काढले. ‘ताजमहल’मधून नेतन्याहू दाम्पत्य अमर विलास हॉटेलमध्ये रवाना झाले.