बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत सट्टेबाजांची भाजपला पसंती

Continues below advertisement
कर्नाटक विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कर्नाटकची सत्ता कोण काबीज करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विविध सर्वेक्षणांची आकडेवारीही समोर आली असून, सर्वच सर्वेक्षणांमध्ये वेगवेगळा कल दिसत आहे. अशातच सट्टा बाजारानेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवला आहे. कर्नाटकात काँटे की टक्कर होणार असून, कुणालाही बहुमत मिळणार नाही. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहून किंगमेकरची भूमिका निभावेल, असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवला जातो आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram