
बंगळुरु : 'वायफाय डब्बा'कडून स्वस्त आणि मस्त इंटरनेट सेवा
Continues below advertisement
इंटरनेटची स्वस्त आणि मस्त सेवा अशी ओळख अत्तापर्यंत तरी जिओची होती, मात्र जिओपेक्षाही स्वस्त रेटमध्ये तुम्हाला वायफाय मिळालं तर? नव्या स्टार्ट कंपनीने दिलेल्या ऑफरमुळे रिलायन्स जिओलाच्या ऑफर्सनाही टक्कर दिली आहे. 'वायफाय डब्बा' असं या कंपनीचं नाव असून अवघ्या 2 रुपयांत तुम्हाला वायफाय वापरता येणार आहे. केवळ 2 रुपयात तुम्हाला 100 एमबी डेटा मिळेल, तर 20 रुपयात 1 जीबी डेटा मिळू शकणार आहे. हा प्लॅन केवळ 24 तासासाठी असणार आहे. बंगळुरुमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे.
Continues below advertisement