हैदराबाद : बंडारु दत्तात्रय यांच्या 21 वर्षीय मुलाचं हार्ट अटॅकने निधन

Continues below advertisement
सिकंदराबाद : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बंडारू दत्तात्रय यांच्या मुलाचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. 21 वर्षीय बंडारू वैष्णव एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकत होता.

रात्रीच्या जेवणानंतर वैष्णवच्या छातीत दुखायला लागलं. त्यानंतर वैष्णवला सिकंदराबादच्या गुरु नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram