बेळगाव : चंद्रकांत पाटलांनी कन्नड गीतावर सीमावासियांची नाराजी, चंद्रकांत पाटलांचा पुतळाही जाळला

Continues below advertisement
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कन्नड भाषेत गायलेल्या गाण्यावर आता सीमाभागामधून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. बेळगावच्या मराठी भाषिक तरुणांनी चंद्रकांत पाटल्यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं...शिवाय हे मराठी भाषिक तरुण आज चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी बेळगावहून कोल्हापुरला रवाना झालेत.
सीमाप्रश्नाचे समन्वय मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी सीमाभागातल्या तगव गावातल्या एका कार्यक्रमात कन्नड गीताच्या काही ओळी गायल्या..या ओळींचा अर्थ जन्माला यायचं असेल तर कर्नाटकात या असा होतो..
यानंतर आता सीमाभागातले मराठी भाषिक चांगलेच संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram