बेळगाव : स्टंटबाजी महागात, मद्यधुंद तरुणाचा गोकाक धबधब्यात पडून मृत्यू

Continues below advertisement
बेळगावातील घटप्रभा नदीवर असणाऱ्या गोकाक धबधब्यावर गेलेल्या तरूणाला स्टंट करणं जीवावर बेतलं आहे. उस्मान काझी असं या तरुणाचं नाव आहे.

रमजान ईदचा सण साजरा  करून 35 वर्षीय  उस्मान त्याच्या भावासोबत धबधब्यावर गेला होता. मात्र त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील उस्मान अतिउत्साहात धबधब्याच्या टोकापर्यंत आला. तिथे तो विविध स्टंट करु लागला. थबथब्यावरुन तो एक पायरी खाली उतरला. तिथून त्याचा पाय घसरला आणि थेट 50 फूट खोल धबधब्यात कोसळल्याने त्याचा जीव गेला.

हा तरुण घटप्रभा इथलाच रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. केवळ अतिउस्ताहामुळेच त्याचा जीव गेल्याचं व्हिडीओतून दिसतं.  या घटनेचा व्हिडीओही उपस्थित पर्यटकांनी शूट केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram