बीड : एका हातात साप, दुसऱ्या हातात सलाईन! चावलेल्या सापाला हातात घेत तरुणाने उपचार घेतले

Continues below advertisement
साप चावल्यानंतर सापाला दूर फेकून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न साधारणत: आपण करतो. मात्र बीडमधील तरुणाने सापासह रुग्णालय गाठले आणि उपचार घेतले. एका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलाईन, अशा स्थितीत लखन नामक तरुण हॉस्पिटलमध्ये बेडवर उपचार घेत होता.

लखन गायकवाड असे या 27 वर्षीय तरुणाचे नाव असून, तो बीड शहरातील काळा हनुमान ठाणा परिसरात राहणारा आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास लखन गायकवाड हा तरुण साप चावला म्हणून स्वत: चालत जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याच्या हातात पाच ते सहा फूट लांबीचा साप होता. हातातील साप पाहून सुरुवातील डॉक्टर घाबरले. मात्र त्या लखनला उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरु केले.

एका हातात साप व दुसऱ्या हाताला सलाईन असे चित्र पहायला मिळाले. लखनच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याच वेळी सर्प मित्र व पोलिस असलेले अमित मगर यांना फोन करुन बोलावून घेतले गेले. बीड जिल्हा रूग्णालयात अपघात कक्षात लखन यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्प मित्र मगर हे रुग्णालयात आल्यानंतर लखनच्या हातातून साप काढून घेण्यात आला. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लखनने हातात साप घेऊन उपचार घेतले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram