बीड: मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षण, बेरोजगारी आणि बँकेचं कर्ज यामुळे पुन्हा एका तरुणानं आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातल्या विडा गावात अभिजीत देशमुख नावाच्या तरुणानं घराजवळच्या झाडाला गळफास लावून घेतला. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण, बँकेचं कर्ज आणि बेरोजगारी या बाबींचा उल्लेख आहे. 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं विज्ञानातून MSC चं शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी नसल्यामुळे तो अस्वस्थ होता. केज पोलीस ठाण्यात या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. नोकरी नाही आणि पैसा नसल्यामुळे व्यवसायही करता येत नाही., असं काही दिवसांपासून तो मित्रांशी बोलत होता, अशी माहिती आहे.