बीड : अजित पवारांच्या वैयक्तिक टीकेला सुरेश धस यांचं उत्तर
राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या गद्दाराला पुन्हा संधी देणार नाही, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सुरेश धस यांच्यावर टीका केली. या शिवाय वैयक्तिक पातळीवरची टीकाही अजित पवारांनी केली. त्याला सुरेश धस यांनी उत्तर दिलं. अजित दादांबद्ल मलाही माहिती आहे. पण आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून अशी अजित पवारांची सवय असल्याचं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिलं.