स्पेशल रिपोर्ट : बीड : डोंगराच्या खोदकामादरम्यान मूर्ती सापडली, मूर्तीशेजारी नाग
Continues below advertisement
परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी गावाजवळील जलालपूर शिवारात जेसीबी मशिनने खाणीचे खोदकाम सुरु होते. त्या ठिकाणी अचानक एक प्राचीन देवतेची मूर्ती सापडली असून त्या मूर्तीजवळ नाग बसून होता.
हे दृश्य पाहण्यासाठी व त्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. त्या मूर्तीची हळद-कुंकू वाहून उदबत्ती पेटवून भाविकांनी पूजन केले. ही वार्ता वाऱ्यासारखी आसपासच्या गावात पसरली असून भाविकांचे लोंढे त्या मूर्तीकडे धावत आहेत. गर्दी वाढत असल्यामुळे या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी वाढली असतानाही मूर्तीपासून नाग हलायला तयार नव्हता.
तहसीलदार शरद झाडके यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले की, आपण बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले असून पुरातत्व खात्याला ही मूर्ती तपासणीसाठी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.