बीड : मुख्यमंत्र्यांना पंढरीत महापूजा करु देणार नाही, परळीत मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2018 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज दुपारी सुरू झालेलं आंदोलन अधिक तीव्र झालंय.
जोपर्यंत राज्य सरकारच्या नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतलाय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज दुपारी बीडच्या परळीमधून एल्गार पुकारण्यात आला.
आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना महापूजा करु देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते. परळीच्या शिवाजी चौकातुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गावागावात जाऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला.