बीड : मुलीला सांभाळण्यास असमर्थ, 22 दिवसांच्या चिमुकलीला स्वीकारण्यास आई-वडिलांचा नकार
Continues below advertisement
कुणावरही येऊ नये अशी वेळ बीड जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या 22 दिवसांच्या तान्हुलीवर आली आहे. ही मुलगी आपली नसल्याचं आई-वडिलांचं म्हणणं आहे, ज्यामुळे या मुलीला जन्मल्यापासून अजून मातृत्त्वाची ऊबही मिळू शकलेली नाही. अखेर पुन्हा एकदा ही मुलगी अनाथ झाली आहे.
मोठ्या गोंधळानंतर या मुलीचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला होता. मात्र आपण ही मुलगी सांभाळण्यासाठी समर्थ नाही, असा अर्ज थिटे दाम्पत्याने बीड जिल्हा महिला आणि बालकल्याण समितीकडे दिला. समितीने दाम्पत्याचं समुपदेशनही केलं, मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर या चिमुकलीची रवानगी औरंगाबादच्या शिशुगृहात करण्यात आली आहे.