बीड : पंकजा मुंडेंचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!
Continues below advertisement
लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. कारण भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली आहे.
गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.
मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आता अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली.