बीड : लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलिसात रुजू

Continues below advertisement
माझ्यासाठी आजचा भाग्याचा दिवस आहे, असे म्हणत लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदा ललित कुमार पोलिस खात्यात रुजू झाला. माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी ललिता साळवे या वैद्यकीय रजेवर होत्या. त्यांच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, आज पहिल्यांदाच ललित पुरुष कर्मचारी म्हणून रुजू झाला आहे. एक महिला म्हणून पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर, पुन्हा पुरुष म्हणून रुजू होण्याची एव्हाना ही राज्यातील पहिलीच घटना आहे. म्हणूनच या घटनेकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली ललिता 1 महिन्यापूर्वी वैद्यकीय रजा घेऊन लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबईला गेली होती. आज पुन्हा ते माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाले.

आज ते बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना भेटणार आहेत. आजपासून पुढे ते ललित कुमार म्हणून बीड जिल्हा पोलीसात कार्यरत असतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram