बीड : सुरेश धस यांनी जिप सदस्यांसाठी पंकजांकडून 15 कोटी घेतले : धनंजय मुंडे
Continues below advertisement
राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपाशी घरोबा केलेल्या सुरेश धस यांनी आपल्याकडील 5 जिल्हा परिषद सदस्य भाजपाला देण्यासाठी तब्बल 15 कोटी रुपये घतले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.
सुरेश धस यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब आजबे यांनी आज भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप केला.
धनंजय मुंडे यांच्यामुळेच आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचा आरोप यापूर्वी सुरेश धस यांनी केला होता. मात्र पैसे घेऊन मदत केल्याचा आरोप केल्याने आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावर काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement